Pimpri : अन् कन्या विद्यालयात रंगला माजी विद्यार्थिनीं मेळावा

एमपीसी  न्यूज  – शिक्षकांनी शाळेत केलेली शिक्षा… यशानंतरची शाबासकी…वर्गात बाकावर बसून केलेल्या खोड्या… शाळेशी जडलेले ऋणानुबंध उलगडत आणि शाळेतील संस्काराच्या बीजांमुळे घडल्याची ग्वाही देत पिंपरीतील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयातील माजी विद्यार्थिनीं मेळावा विशेष रंगला.

विद्यालयाच्या सभागृहात या मेळाव्याचे आयोजन केले होते. थोर शिक्षणमहर्षी व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या  पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सुमारे दोनशे माजी विद्यार्थिंनी उपस्थित होत्या. पिंपरी-चिंचवड  महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरिजा कुदळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा जाधव, मनीषा निकम, शुभांगी दोरगे आदी उपस्थित होते.

“कर्मवीरांचा जयजयकार”, “रयत शिक्षण संस्थेचा विजय असो”, यावेळी घोषणा देण्यात आल्या. जुन्या आठवणींच्या चर्चा व हास्य कल्लोळाने हा मेळावा रंगला होता.  शिक्षक व त्यांच्या जुन्या मैत्रिंणीबरोबर भेट  झाल्याने एक वेगळा आनंद अनुभवायला मिळाला, आठवणी ताज्या झाल्या असे श्रध्दा अवताडे, युगंधरा बांदल, अरुणा काटे, किर्ती कुलकर्णी, प्रियंका चव्हाण, दिपाली सारडा, सुप्रिया पिसाळ, स्वराली मांडे, विशाखा बलकवडे, किरण भोईर वाघेरे,  सांगितले.

शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा जाधव  म्हणाल्या की, आपल्या शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असून त्यांनी शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या.

यावेळी शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी चित्रफितीद्वारे दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संगीता पडवळ यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी दोरगे व अनघा रांगणेकर यांनी केले. आभार रोहिणी काकडे यांनी मानले.  कार्यक्रमाचे संयोजन मनीषा निकम , रोहिणी काकडे, शुभांगी दोरगे आदी शिक्षकांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.