-MPC-TOP-MOST-BANNER-I

Bopkhel News : नोकरी देण्याचे अमिश दाखवून माजी सैनिकाची साडेआठ लाखाची ऑनलाईन फसवणूक

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – माजी सैनिकाला नोकरी देण्याचे अमिष दाखवून चार जणांनी मिळून आठ लाख 43 हजार 750 रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. हा प्रकार 11 जुलै ते एक ऑगस्ट 2020 या कालावधीत गणेशनगर, बोपखेल येथे घडला.

शशांक शेखर मंडल (वय 52, रा. गणेशनगर, बोपखेल) यांनी याबाबत दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 9319323822 मोबाईल धारक अदिती शर्मा, 9717761901 मोबाईल धारक शीतल, 9717229667 मोबाईल धारक सारिका आणि 9996209529 मोबाईल धारक राजीव गुप्ता अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शशांक मंडल हे माजी सैनिक आहेत. त्यांना आरोपींनी नोकरीचे अमिश दाखवले. नोकरी लावण्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पेटीएम द्वारे आठ लाख 43 हजार 750 रुपये घेतले. पैसे घेऊन फिर्यादी यांना नोकरी न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

याबाबत भारतीय दंड विधान कलम 420, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 66 (सी) (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.