_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Baramati : टँकरमधून स्पिरीट चोरीच्या धंद्याचा ‘एक्साईज’कडून पर्दाफाश ; दोघांना अटक, टॅंकरसह 62 लाखाचा मुद्देमाल जप्त

Excise exposes spirit theft from tanker; Two arrested, Rs 62 lakh seized along with tanker: टँकरमधून स्पिरीट चोरीच्या धंद्याचा 'एक्साईज'कडून पर्दाफाश ; दोघांना अटक, टॅंकरसह 62 लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसीन्यूज : टँकरमधून स्पिरीट चोरुन ढाबा मालकाला विक्री करणाऱ्या टँकर चालकासह ढाबा मालकाला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. या कारवाईत सोळा चाकी टॅंकर सह चाळीस हजार लिटर स्पिरिट, प्लास्टिकसह 62 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. बारामती तालुक्यातील भोंडवेवाडी येथे ही कारवाई करण्यात आली.

टँकर वाहनचालक सुखनाम सिंग आणि ढाबा मालक पुखराज भार्गव, अशी अटक आरोपींची नावे आहेत. सुखनाम सिंग हा मध्यप्रदेश येथून टँकरमध्ये स्पिरिट भरुन ते केरळ येथे पोहोच करण्यासाठी घेऊन चालला होता.

बारामती तालुक्यातील सुपे – मोरगाव रस्त्यावरील भोंडवेवाडी येथील रंगीला राजस्थान ढाबा येथे सिंग हा टँकरमधून स्पिरीट चोरुन ते ढाबा मालक भार्गव याला विकत होता.

_MPC_DIR_MPU_II

याबाबत माहिती मिळताच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संतोष झगडे आणि विभागीय भरारी उपायुक्त प्रसाद सुर्वे यांनी सापळा रचून या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

या कारवाईत सोळा चाकी टॅंकर सह चाळीस हजार लिटर स्पिरिट, प्लास्टिकसह 62 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लॉकडाउनच्या काळातील राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही मोठी कारवाई आहे.

भार्गव हा मूळचा राजस्थान येथील आहे. तो चोरीचे स्पिरिट बनावट दारू आणि हातभट्टीवाल्यांना विक्री करत होता. यापूर्वीही भार्गववर याबाबतचे गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.