Nigdi News : आयआयसीएमआर निगडी येथे ऑनलाईन पालक – शिक्षक मेळावा उत्साहात 

एमपीसी न्यूज – औद्योगिक तंत्र शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ इंडस्ट्रियल अँड कॉम्प्युटर मॅनॅजमेन्ट अँड रिसर्च, निगडी या संस्थेत एमसीएच्या विद्यार्थ्यांसाठी पालक – शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 23 जुलै रोजी मायक्रोसॉफ्ट टीम्सवर ऑनलाइन पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. 

डायरेक्टर डॉ. दीपाली सवाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या मेळाव्यात एमसीए प्रथम वर्षाचे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. डॉ. दीपाली सवाई यांनी संस्थात्मक उद्दिष्टे स्पष्ट करून त्यासाठीची कृती योजना सांगितली. यावेळी आयआयसीएमआरमध्ये इंटरनॅशनल सर्टिफिकेशन्ससाठी दिले जाणारे मोफत प्रशिक्षण, परदेशी भाषा प्रशिक्षण, एम्प्लॉयबिलिटी एन्हान्समेंट प्रोग्रॅम, सॉफ्ट स्किल प्रशिक्षण, मेन्टॉरिंग उपक्रम, ARKO क्लब विषयी माहिती देण्यात आली.

एमसीए प्रथम वर्षाच्या समन्वयक किरण शिंदे यांनी शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी काही पालकांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. पालकांसाठी ऑनलाइन ब्रेन जिम ऍक्टिव्हिटीस व मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विभाग प्रमुख रेणू मॅथ्यू यांनी आभार प्रदर्शन केले. रूपाली भंगाळे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.