_MPC_DIR_MPU_III

Pune News : पुण्यात उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या तरुणीच्या आत्महत्येने खळबळ

प्रेमसंबंधातून प्रकार घडल्याची चर्चा

एमपीसी न्यूज : वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महंमद वाडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या तरुणीने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

_MPC_DIR_MPU_IV

पूजा चव्हाण (वय 22) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. महंमदवाडीतील ए वन पार्क या उच्चभ्रू सोसायटीत ती राहत होती. एका व्यक्तीसोबत तिचे प्रेमसंबंध होते आणि यातूनच हा प्रकार घडल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये होत आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पूजा चव्हाण ही रविवारी ए वन पार्क सोसायटीत आपल्या घरात होती. या वेळी तिच्या सोबत तिचे दोन मित्रही होते. मध्यरात्रीच्या सुमारास तिने अचानक पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली. यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परंतु तिने आत्महत्या का केली अद्याप स्पष्ट झाले नाही.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मयत तरुणीच्या आई वडिलांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल. वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.