Pune : सौर उर्जा उपकरणांच्या ‘सोलर एक्स्पो १९’प्रदर्शनाला उत्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – सौर उर्जेवर चालणारे सोलर वॉटर हिटर, सोलर ड्रायर, सोलर रेफ्रिजरेटर, सोलर कुलर जनरेटर, इन्व्हर्टर याबरोबरच विविध उपकरणे पाहण्यासाठी पुणेकरांनी एकच गर्दी केली. महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (MASMA) च्या वतीने “सोलर एक्स्पो १९”चे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसियेशन (MASMA) चे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, माजी अध्यक्ष संजय कुलकर्णी, सचिव नरेंद्र पवार, खजिनदार राजेश मुथा, उपाध्यक्ष अनिल बैकेरीकर, संजय देशमुख उपस्थित होते.

दोन दिवसीय प्रदर्शन हे रविवारपर्यंत असणार आहे. तब्बल ४० हून अधिक सौर उर्जा उपकरण उत्पादकांची उत्पादने याठिकाणी प्रदर्शनात विक्रीसाठी आहेत. यामध्ये छोट्यात छोट्या वस्तू पासून ते मोठ्या उद्योजकांना लागणारी
उपकरणे आहेत. सौर उर्जा उपकरणांविषयीची विक्रीची जास्त दुकाने नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक ते लघु मध्यम उद्योजक यांना विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी या प्रदर्शनाचा फायदा होणार आहे.

राज्यभरातील सौर उर्जा उपकरण उत्पादक उद्योजक आणि वापरकर्ते ग्राहक यांच्या वतीने MERC च्या नवीन प्रस्तावित मसुद्यातील नियम आणि कायद्याचा आढावा घेण्यात आला. याचबरोबर त्याचा प्रभाव आणि पुढील कृती योजनांचा
समावेश होता. सौर औष्णिक आणि उष्णता पंप संकरित तंत्रज्ञान याबाबत विविध तज्ञांनी चर्चा केली.

शेतीसाठी लागणारी वीज हा महत्वाचा घटक असून, आज कित्येक शेतकरी वीजेवर अवलंबून आहे. त्यासाठी सोलर फार्मिंगची संकल्पना सुद्धा यावेळी मांडण्यात आली. भारतीय संस्कृतीत सूर्यनस्मकार करून सूर्य देवाची उपासना केली जाते.
त्याचा उद्देश फक्त शक्ती मिळवणे हा नसून सूर्याप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करणे असते. यावरून आपण समजू शकतो की पूर्वीपासून लोक सुर्याची उपासना करत असत. एका बाजूला औद्योगिक विकास व शहरीकरणामुळे वाढलेली उर्जेची मागणी तर दुस-या बाजूला जागतिक तापमावाढ, प्रदूषण, नैसर्गिक आपत्तीमुळे जास्तीत जास्त उर्जेची गरज भासू लागली आहे. अपारंपारिक उर्जेमुळे सर्वात योग्य आणि उपयोगी पर्याय म्हणजेच सौरउर्जा आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त सौर उर्जेचा आणि उपकरणांचा वापर करण्याचे आवाहन महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसियेशन (MASMA) चे अध्यक्ष प्रदीप कुलकर्णी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.