Exclusive Interview of Dr. Narendra Vaidya: ‘लोकमान्य’तर्फे पुण्यात प्रथमच हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीची उभारणी’

एमपीसीन्यूज (यशपाल सोनकांबळे) :  पिंपरी चिंचवड येथे लोकांच्या आरोग्य सेवेमध्ये नावाजलेले, नामांकित लोकमान्य हॉस्पिटल. पुणेकरांच्या सेवेसाठी गोखलेनगर येथे हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी या नव्या हॉस्पिटलच्या उभारणीमागील भूमिका स्पष्ट करणारी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य यांची विशेष मुलाखत.

प्रश्न : सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे नेमके काय आणि यामध्ये कोणकोणत्या सर्जरी केल्या जातात ?

माणूस हा दोन पायावर चालणारा एकमेव प्राणी आहे. त्यामुळे सांध्याची सतत झीज होत असते, त्यामुळे त्याची देखभाल दुरूस्ती देखील करावी लागते. सांध्यामधील कुर्च्या कार्टिलेज झिजायला लागतात आणि मग हाडे एकमेकांना घासायला लागली की अतीव वेदना व्हायला लागतात.

त्यामुळे हळू हळू चालायला येत नाही लंगडणं चालू होतं. पायाला बाक येतो, पायाला वाकडेपणा येतो. वेदना असह्य झाल्या की आयुष्य नकोसं वाटंत. त्यामुळे क्वालिटी ऑफ लाईफ प्रचंड प्रमाणात हँपर होते. त्यामुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे सांध्यामधील कुर्च्या म्हणजे कार्टिलेज बदलणं.

पुर्वी शस्त्रक्रिया करत असताना हाड चांगलं कापावं लागायचं पण आता सांध्यांमधील लिगामेंट कायम ठेवून मूळ रचना तशीच ठेवून शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे आपलं गुणवत्तापूर्ण जीवन सुधारतं.

प्रश्न : साधारण कोणकोणत्या सांध्यांमध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया करू शकतो ?

शरीरातील प्रत्येक सांध्यांमध्ये सांधेरोपण शस्त्रक्रिया करू शकतो. त्यामध्ये शरीरातील सर्व चार महत्त्वाचे सांधे आहेत. खांदा, कोपरा, हिप जॉईंट आणि मणक्यातील गादी बदलणे अशा सर्व सांध्यांमध्ये शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.

पुण्यामध्ये कृत्रिम सांधेरोपण करणारा मी पहिला सर्जन होतो. गेली 28 वर्षे सांधेरोपण करण्याची प्रक्टिस मी करत आहे. आता जवळपास २० हजाराहून जास्त गुडघ्यांचे सांधेरोपण केले आहेत. आपल्या देशात सर्वाधिक गुडघ्याचे सांधेरोपण होतात. कारण गुडघ्याचे सर्वात जास्त विकार आपल्या समाजात दिसतात.

प्रश्न  : गेल्या 40  ते 45  वर्षांपासून पिंपरी चिंचवड येथे लोकमान्य हॉस्पिटल लोकांच्या सेवेत आहे. लोकांचा विश्वास आहे आणि नाव आहे. परंतु पुण्यात गोखलेनगर येथे नवीन लोकमान्य एचएसएस हे नवीन रुग्णालय उभारलं आहे. त्यामागील भूमिका काय ?

लोकमान्य हॉस्पिटलची स्थापना माझे वडील डॉ.व्ही.जी. वैद्य यांनी 1972-73 साली केली होती. पिंपरी चिंचवड हा ग्रामीण भाग समजला जायचा. त्यामध्ये हळूहळू सुधारणा होत गेली. आता ते शहर म्हणून विकसीत होत आहे. त्यामुळे त्यामध्ये जसजशी वाढ झाली त्याप्रमाणे वेगवेगळ्या रुग्णांची वाढ होत गेली.

त्यांच्या गरजा वाढू लागल्या. त्यामुळे नव तंत्रज्ञान आम्ही पहिल्यांदा पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात सर्वप्रथम आणलं. देशातील पहिला एक्स्प्रेस हायवे पुणे मुंबई झाल्यानंतर पहिली इमर्जन्सी मेडिकल सर्विस – इएमएस लोकमान्य हॉस्पिटलमध्येच सुरू झाली.

त्यामुळे त्या महामार्गावर जे अपघात होत होते. त्या अपघातामध्ये फरक असायचे. साध्या रस्त्यावरील अपघात, घरगुती पडल्यामुळे झालेले अपघात आणि एक्सप्रेस हायवेवरील भयंकर अपघात यामध्ये प्रचंड तफावत आहे.

त्यामुळे 1996  साली इएमएस आणि गोल्डन अवर प्रोजेक्टमध्ये आम्ही चालू केली. त्यानंतर आजतागायत जवळपास पावणे दोन लाख लोकांना आम्ही वाचवू शकलो. नवनवीन गोष्टी तंत्रज्ञान पिंपरी चिंचवड भागालाच नाही तर संपूर्ण देशाला देऊ शकलो.

अस्थि शस्त्रक्रियेमध्ये सर्वप्रथम लेझरचा वापर आम्ही केला. नेविगेशन म्हणजे कम्प्युटर असिस्टेड रिप्लेसमेंट 2001 साली पहिल्यांदा पिंपरी चिंचवड भागात आम्ही केलं.

1972  साली प्राथमिक स्वरुपातील लोकमान्य हॉस्पिटल आज जगभरातील लंडन युरोपच्या धर्तीवर शस्त्रक्रिया करणारं पहिलं हॉस्पिटल बनलं. जगात कुठेही जाण्याची गरज भासणार नाही अशी व्यवस्था लोकमान्यमध्ये आम्ही निर्माण केली.

पिंपरी चिंचवड शहरात सर्वसामान्य लोकांना स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा देता आली पाहीजे या उद्देशाने आम्ही तंत्रज्ञान आणत गेलो.

त्यानंतर 2016 साली देशातील नव्हे तर आशिया खंडातील सर्वात पहिलं रोबोटीक नी रिप्लेसमेंट तंत्रज्ञान पिंपरी चिंचवड येथे आम्ही आणू शकलो. ज्यावेळी निगडीमध्ये आम्ही लोकमान्य हॉस्पिटलमध्ये हे नव तंत्रज्ञान आणलं.

त्यावेळी आमच्या लक्षात आलं की लोकमान्यमध्ये केवळ पिंपरी चिंचवड, पुणे शहर किंवा जिल्ह्यातून येणारे रुग्ण नाहीत. तर संपूर्ण राज्यभरातून देशातून परदेशातून देखील रुग्ण उपचार घेण्यासाठी येत होते.

जगातील तब्बल 16  देशांमधील रुग्ण लोकमान्य मध्ये आले आहेत. लॉकडाऊन नंतर बिहार, उत्तर प्रदेशमधील रुग्णांवर देखील आम्ही शस्त्रक्रिया केल्या आहेत. लोकमान्य मधील नव तंत्रज्ञान आणि त्याचे फायदे लक्षात आल्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतायत आणि शस्त्रक्रिया करून घेत आहेत.

ही गरज लक्षात घेऊनच आम्ही शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारं सर्वसामान्य रुग्णांना उपचार देणारं रुग्णालय असावं. स्वस्त आणि परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा देण्याच्या उद्देशाने स्पेशालिटी सर्जिकल सेंटर उपलब्ध करून दिलं आहे. त्यातून गोखले नगर येथे हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरी उभारण्यात आलं. लोकांना रेल्वे स्टेशन, एयरपोर्ट जवळ असल्यामुळे 125 बेडचे अत्युच्च तंत्रज्ञानावर आधारीत सर्जरी करणारे हॉस्पिटल म्हणून हे उभारलं आहे.

जेणेकरून राज्य नव्हे तर देशातील सर्वांसाठी शस्त्रक्रिया करणारे हॉस्पिटल बनावे हा उद्देश आहे. आता नवीन रोझा रोबोटीक हे नव तंत्रज्ञान आम्ही याठिकाणी लाँच केलं आहे. देशात कुठेही ही टेक्नॉलॉजी आलेली नाही. ऑर्थोपेडीक, न्यूरोसर्जरी, प्लॅस्टिक सर्जरी, लॅप्रोस्कोपीक सर्जरी आहे अशा सर्व सर्जरी देखील या ठिकाणी होऊ शकणार आहे.

कारण रुग्णालयांमध्ये मल्टिस्पेशालिटी असतात त्यामुळे त्यांचा फोकस हरवतो असं मला वाटतं. म्हणून नवतंत्रज्ञानावर आधारीत फोकस केयर दिली पाहीजे या उद्देशाने हे हॉस्पिटल उभारलं गेलं आहे. त्यामध्ये जागतिक दर्जाचे ऑपरेशन थिएटर आहेत.

तसेच अनुभवी सर्जन, उपकरणांसह रुग्णांना ग्रुप फिजीओ थेरपी देखील केली जाते. रुग्ण पूर्ण बरा व्हावा यासाठी डे केयर सर्जरी, पेनलेस सर्जरी करण्यासाठी हे रुग्णालय नक्की मदतशीर ठरेल. पुण्यातील नव्हे तर देशातील रुग्णांसाठी हे महत्त्वाचे केंद्र बनेल याचा आम्हाला नक्की विश्वास वाटतो.

प्रश्न  : पुणे हे मेडिकल टुरिझम केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर येत आहे. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये अशा कोणत्या सर्जरीज आहेत की जेणेकरून मेडिकल टुरिझम वाढू शकेल ?

ऑर्थोपेडीक मधील सर्वात आधुनिक तंत्रज्ञान आम्ही लोकमान्य एचएसएसमध्ये आणलं आहे. उदाहरणार्थ नी रिप्लेसमेंटसाठी नेवियो रोबोटिक्स, रोझा रोबोटिक्स अशा तीन अत्याधुनिक तंत्रज्ञान आम्ही आणलं आहेच. लॉकडाऊन नंतर शंभरहून जास्त नी रिप्लेसमेंट सर्जरी झाल्या आहेत.

की होल सर्जरी, मणक्यावरील सर्जरी, दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या सर्जरी यासाठी तज्ज्ञ, सर्जन आणि उपकरणं इन्स्टॉल केली आहेत. प्लॅस्टिक सर्जरी करीता देखील सर्व तंत्रज्ञान आहे. आजकाल आपण कसे दिसतो किंवा दिसायला हवे यासाठी जागरुक असतात. भुवई, नाक, हनुवटी यासाठी लायपोसक्शन, बॉडी शेपिंग शस्त्रक्रिया साठी देशातून मागणी वाढत आहे. त्यामध्ये नामांकित सर्जन आमच्याशी सलंग्न आहेत.

प्रश्न  : शस्त्रक्रिया करत असताना मधुमेह, हृदयरोग, रक्तदाबाचे पेशंट असतात त्यांच्यासाठी समातंर आरोग्यसेवा देखील दिली जाते का ?

हो, आमच्या कडे डयग्नॉस्टिक बॅकअप आहे. हिमोग्लोबिन, एक्सरे, टु डी इको, सोनोग्राफी, इसीजी, सीटी स्कॅन वाजवी दरांमध्ये संलग्न आहेत. कृष्णा डायग्नॉस्टिकसोबत टायअप केले आहेत. गुणवत्तेमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड न करता वाजवी दरामध्ये सर्व सुविधा एचएसएस मध्ये उपलब्ध आहेत.

प्रश्न  : लोकमान्य एचएसएस हे लोकांच्या सेवेत पुर्ण क्षमतेने केव्हा पासून सुरू होईल ?

मुळात औपचारीक उद्घाटनापुर्वीच आम्ही सेवेत दाखल झालो आहोत. जगावर कोरोनाचे संकट आले त्यामुळे आम्हाल उद्घाटन करण्यासाठी उशीर झाला. परंतु तत्पुर्वीच आम्ही शस्त्रक्रिया करायला सुरूवात केली आहे. लोकांसाठी हॉस्पिटल सुरू झालेलं आहे.

कोविड साठी 500 च्यावर रुग्णांना सेवा देऊन डिस्चार्ज केलेले आहे. सर्जिकल आयसीयू, डायग्नॉस्टिक सेंटर, फिजीकल आयसीयू, ओपीडी सुरू झाले आहेत.

प्रश्न   : रोबोटिक सर्जरी म्हटले की पूर्वी परदेशात लोक जात होते. त्यामुळे प्रवास खर्च आणि प्रत्यक्ष सर्जरीचा खर्च अफाट होत असे. त्या तुलनेने कशा प्रकारच्या सुविधा लोकमान्य एचएसएस मध्ये असणार आहेत. सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात या सुविधा असतील का ?

साधारण गुडघे प्रत्यारोपण म्हणजे नी रिप्लेसमेंटसाठी जो खर्च लागतो. त्यापेक्षा फार खर्च रोबोटिक सर्जरीसाठी लागत नाही. वाजवी आणि स्वस्त दरात सर्व सर्जरी केली जाते. सर्व स्कीम, इंश्योरन्समध्ये या सर्जरी केल्या जातात.

कोणत्याही रुग्णांना वाजवी दरात रोबोटीक, लेझर, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियांचे दर नियंत्रित दरात उपलब्ध करून देतो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात, खिशाला परवडेल अशा दरात सर्व सर्जरी लोकमान्य एचएसएसमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत.

Lokmanya Hospital For Special Surgery (LHSS)

402/A Gokhale Nagar Road Off Senapati Bapat Marg, Vetal Baba Chowk, Maharashtra 411016

Contact No. (020) 66667777 / 9527094395

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.