Pune : दोन सराईत गुन्हेगार चार तालुक्यातून एक वर्षाकरिता हद्दपार

एमपीसी न्यूज – औंढे व कुसगाव भागात दहशत माजविणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांना मावळ, मुळशी, खेड व हवेली या चार तालुक्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

विकास भाऊ कदम (वय 26, रा. औंढे, ता. म‍ावळ, जिल्हा पुणे) व विजय यशवंत कालेकर (वय 25, रा. कुसगाव बु., ता. मावळ, जिल्हा पुणे) अशी या हद्दपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्यावर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात खून, खूनाचा प्रयत्न, कटकारस्थान अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. कदम व कालेकर हे या भागात दहशत माजवत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

यामुळे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या तडीपारीचा प्रस्ताव पुणे ग्रामीण अधीक्षक यांच्याकडे पाठविला होता. यावर नुकतीच पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर अधीक्षक विवेक पाटील, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे व ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे यांच्या उपस्थितीत सुनावणी होत कदम व कालेकर यांना चार तालुक्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.