Pimpri: महापालिकेतील कार्यकारी अभियंत्याचा डेंगीमुळे मृत्यू 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांचा आज (बुधवारी)डेंगीमुळे मृत्यू झाला. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालविली.

कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांना डेंगीची लागण झाली होती. आठ दिवसांपूर्वी त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज बुधवारी दुपारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या अचानक जाण्याने महापालिकेत हळहळ व्यक्त केली जात आहे. जीवन गायकवाड महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून रुजू झाले होते. भोसरीतील ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयात स्थापत्य विभागात कार्यकारी अभियंता म्हणून ते सध्या कार्यरत होते.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्ल्यूने कहर माजविला असतानाच डेंगीने डोके वर काढले आहे. व्हायरलने औद्योगिकनगरी फणफणली आहे. डेंगीच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.