Pune : गडकिल्ले माहिती व दुर्गसंवर्धन कार्यावर आधारीत ‘शिवरायांचे दुर्गरत्ने’ प्रदर्शन..

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे आयोजित

एमपीसी न्यूज –  छत्रपती शिवरायांच्या गडकोटांची माहिती देणारे तसेच गडसंवर्धन कार्यांची माहिती देणारे भव्य प्रदर्शनाचे आयोजन 1 नोव्हेंबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. हे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे सकाळी 10 ते 8 यावेळात सर्वांसाठी खुले असणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन 1 नोव्हेंबर रोजी अँन्टी करप्शन ब्युरो पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप दिवान व फर्जंद चित्रपटाचे दिग्दर्शक दीग्पाल लांजेकर यांच्या प्रमुख उपस्थितित सकाळी १० वाजता. होणार आहे

दीपावली म्हणजे उत्सव दिव्यांचा, उत्सव नव चैतन्याचा, उत्सव बालगोपाळांच्या गडकिल्ल्यांचा सण, याच उत्सवाच्या आनंदमय वातवरणामध्ये आपणा सर्वां करीता आपल्या छत्रपती शिवरायांच्या गडकोटांची माहिती देण्याकरीता या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात आपणास गडकिल्ल्यांचे अस्तित्व टिकवण्या करीता प्रत्यक्षरीत्या झटना-या दुर्गसेवकांच्या कार्यांच व शिवरायांच्या गडकोटांची सद्या परिस्थिती यांची माहिती दीपावलीच्या मंगलमय वातावरणाच्या निमित्ताने प्रदर्शनाचे माध्यमातुन समोर आणण्याचा प्रयत्न श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांनी केला आहे. नागरीकांनी आर्वजून या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.