Chinchwad : ‘पंतप्रधान ते प्रधानसेवक’ प्रवासाच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मोदींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज –  लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आधारीत “पंतप्रधान ते प्रधानसेवक” या छायाचित्रांचे प्रदर्शन चिंचवड येथे भरविण्यात आले आहे. शनिवारपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील तीन दिवसीय प्रदर्शनाचे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) उद्घाटन झाले आहे. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरूण पवार, जय भगवान महासंघाचे जिल्हा अध्यक्ष गणेश ढाकणे, जय भगवान महासंघाचे शिक्षक संघटना अध्यक्ष खंडूजी खेडकर, उपाध्यक्ष हनुमंत घुगे, राजपूत संघटनेचे पुणे प्रवक्ता राजपूत, नेताजी राजपूत, जितेंद्रसिंह राजपूत उपस्थीत होते.

या प्रदर्शनात भारत सरकारच्या नवीन योजनांचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मन की बातमध्ये साधलेला संवादाची कात्रणे, मोदी यांचे भारतातील विविध राज्यातील विधानसभा रणसंग्रामातील प्रचारक, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध देशातील पंतप्रधान राष्ट्रप्रमुख यांच्या पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट तसेच देशांतर्गत विविध करार, विविध कार्यक्रमाचे केलेले उद्‌घाटन, पंतप्रधान पदाचे उमेदवार लोकसभा निवडणूक 2014, नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय नेतृत्त्व, विदेशातील दौरे यांची छायाचित्रे व वृत्तपत्रातील बातम्यांच्या कात्रणाचा समावेश आहे.

या प्रदर्शनाचे मुख्य आयोजक नितीन चिलवंत व शिवकुमारसिंह बायस यांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह या ठिकाणी गुरूवार, शुक्रवार आणि शनिवारी सकाळी 10 ते रात्री 8:30 पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.