Balewadi News : बालेवाडी येथे शुक्रवारी विमानांच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे – बालेवाडी येथे शुक्रवारी (दि 12) सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत विमानांच्या विभिन्न प्रतिकृतींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 

Chinchwad News : चळवळींना गतिमान करण्यासाठी संगीत प्रभावी माध्यम ठरले – आयुक्त पाटील

प्रवासी विमाने, मिग 29, फायटर विमाने, इ. विमानांच्या प्रतिकृतींचे प्रदर्शन शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये प्रदर्शित करण्यात येईल.तसेच पुण्याचे हवाई दर्शन दाखविणारा माहितीपट देखील दाखविला जाणार आहे.शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांनी सकाळी 10 ते 6 या वेळेत प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.