_MPC_DIR_MPU_III

Pimpri News: छावा मराठा संघटनेचा विस्तार

एमपीसी न्यूज – छावा मराठा संघटनेचा विस्तार सुरूच असून, आता संघटनेने मुंबई शहरातही विस्तार केला आहे. पदाधिकाऱ्यांचा पदग्रहन कार्यक्रम नुकताच पार पडला.

_MPC_DIR_MPU_IV

छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा कोकण संपर्क प्रमुख रामभाऊ जाधव, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन गवांडे यांच्या हस्ते पदांचे वाटप करण्यात आले. यावेळी गणेश सोनवणे, संदीप नर्बेकर, राजेंद्र हेंन्द्रे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

राज दत्तात्रय जाधव यांची मुंबई महानगर प्रदेश उपाध्यक्षपदी, अनमोल कामतेकर यांची मुंबई महानगर प्रदेश सचिवपदी, गणेश गायकवाड यांची मुंबई शहर उपनगर अध्यक्षपदी, प्रणय अशोक मोरे यांची मुंबई महानगर प्रदेश उपसचिवपदी, अमोल पवार यांची मुंबई महानगर प्रदेश संपर्क प्रमुखपदी, प्रदीप जाधव यांची मुंबई महानगर प्रदेश उपसंपर्क प्रमुख पदी, भाऊसाहेब घुले यांची मुंबई शहर-उपनगर सचिवपदी, विनय निवळेकर यांची मुंबई शहर – उपनगर उपाध्यक्षपदी, मनोज पाटील यांची मुंबई शहर – उपनगर संपर्कप्रमुखपदी, दीपचंद भोसले यांची कुर्ला – मुंबई उपनगर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की पदाधिकाऱ्यांनी समाजहित डोळ्यासमोर व संघटनेच्या ध्येयधोरणानुसार वाटचाल करावी. मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकार अलिप्त राहिले आहे. यामुळे केंद्राला याविषयी जागृत करण्यासाठी संघटना अधिवेशन काळात धडक देणार आहे. यामध्ये पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे, असेही रामभाऊ जाधव यांनी नमूद केले.

सचिन गवांडे म्हणाले, की नूतन पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे काम करावे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.