Pune News: चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा, ब्राह्मण महासंघाची मागणी

एमपीसी न्यूज – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली आहे. मुस्लिम बाबराचे नव्हे तर दाते, गोडसे, गाडगीळांचे वंशज आहेत, अशी गरळ ओकली आहे. यामुळे ब्राह्मण समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे पाटील यांची तत्काळ प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केली आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, कणकवली येथे झालेल्या सभेमध्ये भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण समाजाबद्दल आपत्तीजनक टिप्पणी केली आहे. मुस्लिम बाबराचे नव्हे तर दाते, गोडसे, गाडगीळांचे वंशज आहेत असे भाष्य करुन आपला  ब्राह्मण द्वेश दाखविला आहे. समाजबद्दलच्या मानसिकतेचे प्रर्दशन केले आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ या गोष्टीच्या तीव्र शब्दात निषेध करत आहे. स्वत:च्या कर्तुत्वामुळे आपल्या जिल्हातून निवडून न येण्याची खात्री पटल्यानंतर सुरक्षित असा ब्राह्मण बहुल मतदार संघ त्यांनी निवडला. ब्राह्मण विद्यमान आमदारची उमेदवारी कापून आयता बिळावरील नागोबा झाले आहेत.

अपमानास्पद टिप्पणी करणा-या चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण समाजअद्दल घडविणार आहे.  पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करावी. भारतीय जनता पार्टीने ब्राह्मणांना ग्रृहीत धरु नये.  ग्रृहीत धरल्यास भाजपालाही अद्दल घडविण्यात येईल असा इशारा डॉ. कुलकर्णी यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.