Pimpri News : नदीपात्रालगतचा अनधिकृत भराव काढण्यासाठी साडेचार कोटींचा खर्च, स्थायीची आयत्यावेळी मान्यता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्याक्षेत्रातील नदीपात्रालगतचा अनधिकृत भराव काढण्यात येणार आहे. भराव काढून जमिनीची समतल पातळी करण्यात येणार असून त्यासाठी 4 कोटी 37 लाख 32 हजार रुपयांचा खर्च येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्या वाहतात. पवना नदीची महापालिका हद्दीतील एकूण लांबी 24.34 किलोमीटर तसेच इंद्रायणी नदीची एकूण लांबी 20.85 किलोमीटर आहे. नदीच्या पात्रालगतच्या भागात अनधिकृत भराव टाकण्यात आले आहेत.

ह क्षेत्रीय कार्याक्षेत्रातील नदीपात्रालगतचा अनधिकृत भराव काढून जमिनीची समतल पातळी करण्यासाठी महापालिकेने 2 जानेवारी 2021 रोजी निविदा प्रसिद्ध केली. रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेसह 6 कोटी 50 लाख 29 हजार 693 रुपयांची निविदा मागविली होती. त्यामध्ये पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला.

त्यापैकी मे.एच.सी.कटारिया यांची 32.75 टक्के कमी दराची निविदा आली. त्यांनी रॉयल्टी, मटेरियल टेस्टींग चार्जेसह 4 कोटी 37 लाक 32 हजार 469 रुपयांमध्ये काम करण्याची तयारी दर्शविली. त्यांची निविदा तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची असल्याने आणि ठेकेदार मुदतीमध्ये काम मानांकनाप्रमाणे पूर्ण करण्यास सक्षम असल्याने आयुक्त राजेश पाटील यांनी 2 जुलै 21 रोजी निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. त्यानुसार मे.एच.सी.कटारिया या ठेकेदारासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने आज आयत्यावेळी मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.