Indapur Crime News : लघुशंकेसाठी थांबणे पडले महागात ! मुंबईच्या कुटुंबाला भरदिवसा लुटले

एमपीसी न्यूज : कारमधून जाणारे कुटुंबीय लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले असताना अज्ञात चोरट्यांनी कोयत्याच्या धाकाने त्यांना लुटले. त्यांच्याजवळील रोख रक्कम आणि इतर असा एकूण 46 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला.  इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी अंकुश गोरोबा काळे (वय 25) यांनी फिर्याद दिली असून इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये चार अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे मुंबईतील गोरेगाव येथील रहिवासी आहेत. काही कामानिमित्त ते इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आई वडील आणि भावासह जात होते. मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी इंदापूर येथील हॉटेल देशपांडे याठिकाणी लघुशंकेला जाण्यासाठी गाडी थांबवली होती. त्याच वेळी झाडाझुडपातून आलेल्या चार चोरट्यांनी फिर्यादीच्या गाडीची चावी काढून घेतली आणि धारदार हत्याराचा धाक दाखवून फिर्यादीना मारहाण केली.

त्यानंतर फिर्यादीच्या कुटुंबाजवळील रोख वीस हजार रुपये, एक टायटन कंपनीचे घड्याळ, दोन तोळे सोन्याचे दागिने, कानातील दागिने, एटीएम कार्ड असा एकूण 46 हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. इंदापूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक सारंगकर अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.