Good Health Tips : सततच्या बैठ्या कामामुळे वाढला पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

एमपीसी न्यूज (डाॅ. पल्लव भाटीया) – कोरोनामुळे ‘वर्क फ्राॅम होम’ ही संकल्पना बऱ्याचशा लोकांनी आत्मसात केली. वर्क फ्राॅम होममुळे बऱ्यापैकी एकाच जागेवर बसून काम करणे आले, त्यामुळे पाठ आणि कंबरेने आपले दुखणे काढलेच. कोरोना संकटाशी लढण्याचा आणि आपली दैनंदिनी चालू ठेवण्याचा पर्यायी मार्ग म्हणून वर्क फ्राॅम होम किंबहुना बैठ्या कामांना दिलेले प्राधान्य कुठेतरी शारीरीक व्याधींना पुन्हा खुणावू लागले आहेत. परंतु, या सगळ्यावर उपाय काय, यावर मांडलेले खास तज्ज्ञांचे मत तुमच्यासाठी!

 

नागरी भागात नोकरी व व्यवसायानिमित्त बैठ्या कामांचे प्रमाण जास्त असून जास्त वेळ एका जागेवर बसून राहिल्यामुळेच मणक्यांवर ताण पडतो व त्याचे रुपांतर कंबरदुखीमध्ये होते. आज आपल्याला कामाच्या व्यापामुळे स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे कुठेतरी सकाळचे चालणे किंवा व्यायाम कमी पडतो व वाढते वजन ही कंबरदुखीला कारणीभूत ठरते.

ग्रामीण भागात घरी किंवा शेतामध्ये खाली बसून व पुढे वाकून काम करावे लागते, त्यामुळे सुद्धा पाठीच्या व कमरेच्या मणक्यांवर ताण पडतो. त्याचे रुपांतरही नंतर कंबरदुखीमध्ये होते. वाढत्या वयानुसार ही समस्या वाढत जाते. उतरत्या वयात हाडांची ठिसूळता वाढत जाते.

स्त्रियांमध्ये मोनोपॉजनंतर अर्थात मासिक पाळी बंद झाल्यावर ही समस्या जास्त प्रमाणात बळावते. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येकालाच कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास जाणवतोच. कंबरदुखी हा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा त्रास असून आपले व्यस्त आयुष्य व काम व प्रवासाचा तणाव या बाबींमुळे आपण याकडे दुर्लक्ष करत असतो.

जाणून घेऊया कंबरदुखीची कारणे –

  • नागरी भागात नोकरी व व्यवसायानिमित्त बैठ्या कामांचे प्रमाण जास्त असून जास्तवेळ एका जागेवर बसून राहिल्यामुळेच मणक्यांवर ताण पडतो ज्याचे रुपांतर कंबरदुखीमध्ये होते.
  • आज आपल्याला कामाच्या व्यापामुळे स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे कुठेतरी सकाळचे चालणे किंवा व्यायाम कमी पडतो व वाढते वजन ही कंबरदुखीला कारणीभूत ठरते.
  • ग्रामीण भागात घरी किंवा शेतामध्ये खाली बसून व पुढे वाकून काम करावे लागते. यामुळे सुद्धा पाठीच्या व
    कमरेच्या मणक्यांवर ताण पडतो व त्याचे रुपांतरही नंतर कंबरदुखीमध्ये होते.
  • वाढत्या वयानुसार ही समस्या साधारणपणे वाढते. उतरत्या वयात हाडांची ठिसूळता वाढत जाते. स्त्रियांमध्ये मोनोपॉजनंतर अर्थात मासिक पाळी बंद झाल्यावर ही समस्या जास्त प्रमाणात बळावते.

याची लक्षणे कशी ओळखाल?

जेव्हा कमरेच्या मणक्यावंर ताण पडतो तेव्हा कुठेतरी ज्या नसा मणक्यांमधून पायात जात असतात त्यांच्यावरही वेगवेगळ्या कारणांनी दबाव पडतो. त्यानंतर, खरी कंबरदुखीची लक्षणे दिसायला लागतात.

Slip Disc (स्लिप डिस्क) / Sciatica (सायटिका) म्हणजे काय?

या आजारामध्ये दोन मणक्यांच्या मधील चकती मागे सरकून मज्जारज्जू (Spine Cord) वर दबाव देते व त्यामुळे लक्षणे दिसायला लागतात. कमरेचे दुखणे, पायात जाणे, एका शिरेने पूर्ण विशिष्ट शिरेने (दिशेने) मुंग्या येणे. पाय भरून येऊन जडपणा किंवा बधीरपणा जाणवते इत्यादी.

Lumbar Conal Stenosis (लंबर कनल स्टिनोसिस) 

या आजारात दोन मणक्यांच्यामध्ये मज्जारज्जूसाठी जी जागा दिलेली असते ती कमी होते. आकुंचन पावते. त्यामुळे मज्जारज्जूचा जो रक्तप्रवाह असतो तो हळू हळू कमी होतो. त्यामुळे लक्षणे दिसायला लागतात. यामध्ये फक्त चालताना पायात मुंग्या येणे किंवा पाय भरून किंवा ठराविक चालल्यावर थांबावे किंवा बसावे लागणे अशी लक्षणे दिसायला
लागतात.

यावर निदान कसे होते ?

वरील लक्षणे दिसून आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे. एक्सरे व एमआरआयच्या साह्याने या आजाराचे निदान करण्यात येते. व तो कोणत्या प्रकारचा आहे हे पाहणे फार गरजेचे असते. त्याच्या अनुषंगाने पुढचे उपचार करणे सोपे जाते.

उपचार व आधुनिक पद्धती यावर कशा पद्धतीने काम करतात?

योग्य वेळेत निदान झाल्यावर जवळपास 90-95 टक्के रुग्णांमध्ये विना ऑपरेशन इलाज करता येऊ शकतो. फिजिओथेरपी, मणक्यांमध्ये रूट ब्लॉकचे इंजेक्शन्स व औषधे याव्दारे तो आजार आटोक्यात आणला जाऊ शकतो.
ज्या रूग्णांमध्ये ऑपरेशनची आवश्यकता असते त्यांच्यामध्येही आता नवनवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने हे ऑपरेशन करणे खूप सोपे झाले आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अवघड शस्त्रक्रिया सुद्धा खूप सोप्या पद्धतीने करता येतात.

  • Endoscopic Surgery (एन्डोस्कोपिक सर्जरी)
  • Microscopic Surgery (दुर्बिणीच्या साह्याने सर्जरी)
  • Rediofrequency (रेडिओफ्रिक्वेन्सी)
  • High Speed Microdrill
  • Tube Dilators
  • Minimal Invasive Surgery

या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने आता कमी वेळेत विनाटाक्याच्या शस्त्रक्रिया होऊ शकतात.

या सर्जरीचे होणारे फायदे –

अत्यंत छोट्या छेदाव्दारे दुर्बिणीच्या मदतीने सर्जरी होत असल्याने कमीत-कमी टाके लागतात. कमीत कमी रक्तस्त्राव होतो. रुग्णालयाती वास्तव्य कमीत कमी असल्याने आर्थिक बचत होते. वेदनारहीत हालचाली होण्यास मदत होते. विना टाक्याच्या मणक्याच्या शस्त्रक्रिया आता एंडोस्कोप व दुर्बिणीच्या साह्याने विनाटाक्याच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. आता पहिल्यासारख्या चिरफाड करून केल्या जाणा-या शस्त्रक्रिया जणू भूतकाळात जमा झाल्या आहेत.

मणक्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीच्या साह्याने केल्या जातात. रुग्णाला त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी चालवले जाते. व साधारणत: तीन आठवड्यांचा अवकाशानंतर तो आपली सर्व कामे पुन्हा करू शकतो. या शस्त्रक्रियांमध्ये कुठल्याच प्रकारचा जिवाला धोका नसतो तसेच ऑपरेशननंतर कसल्याच प्रकारचा अधुपणा व पांगळेपणा येण्याची भीती नाही.

त्यामुळे आजपर्यंत जे काही आपण ऐकत आलोत की मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर अपंगत्व येते ही संकल्पना आपण मोडीत काढायला हवी. कमरेचे वेगवेगळ्या प्रकारचे दुखणे घाबरून अंगावर न काढता वेळेत त्याचा इलाज करायला हवा.

वेळेत उपचार घेणे हाच कंबरदुखी, पाठदुखी व मानदुखी वर रामबाण इलाज आहे. अशा आजाराची लक्षणे जाणवल्यास त्वरीत तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आज अत्याधुनिक बिनटाक्याच्या दुर्बिणीच्या साह्याने केल्या जाणा-या शस्त्रक्रियेमुळे मणक्याच्या आजारांना आता घाबरून जाता कामा नये. या धकाधकीच्या जीवनात स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे ही जणू आपली एक सामाजिक बांधिलकी आहे. कोणते संकट असो किंवा रोजची दैनंदिन कामे यामध्ये स्वतःला जपणे सगळ्यात महत्त्वाचे नाही का?

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा –

Website: https://www.totalspinesolutions.com/

डाॅ. पल्लव भाटीया – (M.S (Ortho), F.A.S.S.I., F.I.A.S.A. (U.S.A), FIGASS (Germany), FNASS (U.S.A))

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.