Khopoli News : खोपोलीतील केमिकल कंपनीत स्फोट,

एकाचा मृत्यू तर चार जण जखमी

 एमपीसी न्यूज : खोपोलीतील एका केमिकल कंपनी मध्ये आज पहाटेच्या सुमारास स्फोट झाला असून यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले आहेत. जशनोव्हा फार्मा असे स्फोट झालेल्या कंपनीचे नाव आहे. कंपनीतील रिऍक्टरचा स्फोट झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. 

 

जशनोव्हा कंपनीत स्फोट झाल्यानंतर शेजारी असलेल्या पेट्रोसोल कंपनीतील सुरक्षा रक्षक राहत असलेल्या ठिकाणचे शेड कोसळले. यात एका सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

जशनोव्हा फार्मा या कंपनीव्यतिरिक्त एस. एस. पेपर ट्यूब, पेन ट्यूब अशा इतर सहा कंपन्या आहेत. जशनोव्हामध्ये झालेल्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत शेजारील आणखी सहा लघु उद्योगांनाही या आगीचा फटका बसला.

 

स्फोटाची माहिती मिळताच खोपोली नगरपरिषद, एचपीसीएल, रिलायन्स, उत्तम स्टील, टाटा स्टील, कर्जत नगरपरिषद, पेण नगरपरिषद असे आजूबाजूचे एकूण दहा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशामक दलाने ही आग आटोक्यात आणली.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.