Pune Crime News : बाणेरच्या उच्चभ्रू वस्तीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

तीन तरुणीची सुटका

एमपीसी न्यूज : पुण्यातील बाणेरच्या उच्चभ्रू वस्तीत मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी यावेळी तीन तरुणीची सुटका केली असून एका महिलेविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. के बी फुंग्रेओ उर्फ माया (वय 29, मूळ मणिपूर) आणि नीतू रोषा या दोन महिलांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की बाणेर मधील श्रौफ सुहाना या सोसायटीतील ‘आराया स्पा अँड सलुन’ या मसाज सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून छापा टाकला असता हा प्रकार. पोलिसांनी या ठिकाणाहून तीन तरुणींची सुटका केली.

या तीनही तरुणी मिझोराम, मनिपुर आणि मेघालय राज्यातील आहेत. आरोपींनी त्यांना पैशाचे आमिष दाखवून पुण्यात आणले होते. त्यानंतर मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास चतु:शृंगी पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.