Pune Crime News : स्पा च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

दहा मुलींची सुटका

एमपीसी न्यूज : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. नॅचरल बॉडी स्पा या मसाज सेंटरवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकून तब्बल 10 पीडित मुलींची सुटका केली आहे. तर स्पा सेंटरच्या मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. 

अर्जुन गोपाल सिंग (वय 21) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर स्पा मालक विकास ढाले हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, कोरेगाव पार्क येथील नॅचरल बॉडी स्पा या मसाज सेंटर मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन या ठिकाणी छापा मारला.

या कारवाई दरम्यान पोलिसांनी नागालँड मणिपूर राजस्थान मुंबई व सोलापूर येथील रहिवासी असणाऱ्या दहा मुलींची सुटका केली आहे. या पीडित मुलींना संरक्षणासाठी महिला संरक्षण गृहात  ठेवण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.