Express Way : द्रुतगती मार्गावर रस्ता ओलांडणा-या व्यक्तीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

Express way : A man crossing the road on an expressway was killed in an unidentified vehicle

एमपीसी न्यूज – द्रुतगती मार्गावर आपली कार रस्त्याच्या बाजूला उभी करून एक व्यक्ती रस्ता ओलांडत होती. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्या व्यक्तीला धडक दिली. त्यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 19) पहाटे सव्वातीनच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से गावाजवळ घडली.

_MPC_DIR_MPU_II

वसंत दत्तू अंधारे (वय 55, रा. माणकेश्वर, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील अंकुश मोहोळ (वय 22) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वसंत अंधारे हे कारमधून पुण्याहून मुंबईकडे द्रुतगती मार्गावरून जात होते. उर्से गावाजवळ आल्यानंतर त्यांनी त्यांची कार मुंबई लेनवर थांबवली आणि ते पुणे लेनवर येत होते. रस्ता ओलांडत असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरात धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

फिर्यादी हे डेल्टा फोर्सचे कर्मचारी आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर डेल्टा फोर्स कडून गस्त घातली जाते. फिर्यादी स्वप्नील मोहोळ हे गस्त घालत असताना त्यांना अंधारे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांची कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभी असून कार असलेल्या विरुद्ध लेनवर त्यांचा अपघात झाला होता.

अज्ञात वाहन चालकाने अंधारे यांना धडक दिली. त्यानंतर अज्ञात वाहन चालकाने अंधारे यांना उपचारासाठी रुग्णालयात न नेता तसेच पोलिसांना घटनेची माहिती न देता निघून गेला. याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1