Express Way Accident News : पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या ट्रेलरला दूधाच्या टॅंकरची धडक; दोघांचा जागीच मृत्यू

टॅंकर चालक आणि टॅंकरमधील सहप्रवासी जागीच ठार झाले. : Hit of milk tanker to trailer stopped to remove puncture; Both died on the spot

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Express Way) पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या ट्रेलरला  दूधाच्या टॅंकरने जोरात धडक दिली. यामध्ये टॅंकर चालक आणि टॅंकरमधील सहप्रवासी जागीच ठार झाले. हा अपघात आज (मंगळवारी, दि. 18) दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास भातन बोगद्याजवळ झाला.

चालक हाजी फुला (वय 43, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश), सहप्रवासी विजय निवृत्ती मरगज (वय 41, रा. विलेपार्ले ईस्ट, मुंबई) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Express Way) भातन बोगद्याजवळ दुपारी एक ट्रेलर (आरजे 02 / जेबी 2043) पंक्चर झाला. त्यामुळे ट्रेलर चालकाने ट्रेलर उभा केला. त्यावेळी पाठीमागून आलेल्या एका दूधाच्या टॅंकरने (एमएच 43 / एडी 6029) ट्रेलरला जोरात धडक दिली.

या भीषण अपघातात टॅंकर चालक हाजी फुला आणि टॅंकरमधील आणखी एक सहप्रवासी विजय मरगज यांचा जागीच मृत्यू झाला. तर टॅंकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या बाबत माहिती मिळताच आयआरबीचे रस्ता सुरक्षा पथक आणि वाहतूक नियंत्रण पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या पथकांनी दोघांचे मृतदेह चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

द्रुतगती मार्गावर (Express Way) पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यात रस्त्यावर हा अपघात झाल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. मात्र, रस्ता सुरक्षा पथक आणि वाहतूक नियंत्रण पथकाने वाहतूक सुरळीत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.