Express Way Accident News : चालकाचे नियंत्रण सुटल्याने साखरपुड्यासाठी निघालेली बस किवळे येथे उलटली; 25 प्रवासी जखमी

एमपीसी न्यूज – चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे-मुंबई द्रुतगती (express way) मार्गावरून निघालेली बस किवळे येथे उलटली. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी बसमधून निघालेले 40 पैकी 25 प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. हा अपघात आज (रविवारी, दि. 27) दुपारी बारा वाजताच्या सुमारास एक्सप्रेस वे एक्झिट किवळे येथे झाला.

एम एच 04 / एफ के 3786 ही बस मुंबई येथील शहापूर येथून सांगलीकडे एका साखरपुडयाच्या कार्यक्रमासाठी निघाली होती. दुपारी बाराच्या सुमारास बस पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील किवळे एक्झिट येथे आली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला. यामुळे बस रस्त्याच्या बाजूला उलटली. अपघात झाल्यानंतर बस चालक निघून गेला.

या अपघातात बसमधील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यातील काहीजण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, देहूरोड पोलीस आणि देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.