Talegaon Dabhade : पुणे-मुंबई एक्सप्रेस वे सकाळपासून बंद

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून वाहतूक वळविण्यात आली

664

एमपीसी न्यूज – पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्या जवळ मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्याने आज सकाळपासून द्रुतगती मार्ग बंद आहे. तर सुत्रांच्या माहितीनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत द्रुतगती मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, जुना पुणे-मुंबई महामार्ग नुकताच खुला झाला असून या मार्गावरून सर्व वाहतूक वळविण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने आज संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले आहे. या मागणीसाठी पुणे-मुंबई मार्गावर मराठा आंदोलकांनी उर्से टोल नाका येथे रास्ता रोको केला आहे. आंदोलनात मराठा समाजातील आंदोलक स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले आहे. तब्बल 800 ते 1000 आंदोलक उर्से टोलनाका येथे एकत्रित आले आहे. त्यामुळे आज गेल्या आठ तासांपासून द्रुतगती मार्ग बंद आहे. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेपर्यंत द्रुतगती मार्गा बंद राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

HB_POST_END_FTR-A1
%d bloggers like this: