Express Way : ब्रेक फेल झालेल्या डंपरची ट्रकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – डंपरचा ब्रेक फेल झाल्याने डंपरची एका (Express Way ) ट्रकला धडक बसली. यामध्ये डंपर मधील चालक आणि सहका-याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान धडक बसलेल्या ट्रक मधील पुठ्ठ्याला आग लागली. ही घटना पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली जवळ घडली.

वाळूने भरलेला डंपर पुणे मुंबई द्रुतगती मार्गाने जात होता. खोपोली जवळ या डंपरचा ब्रेक फेल झाला. डंपरने लेन सोडून पुण्याच्या दिशेने पुठ्ठ्याने भरलेला ट्रक जात होता. ब्रेक फेल झालेल्या डंपरची पुठ्ठ्याने भरलेल्या ट्रकला पाठीमागून धडक बसली. यामध्ये डंपर मधील चालक आणि त्याचा सहकारी यांचा मृत्यू झाला.

Central Railway : रेल्वेच्या पुणे ते लोणावळा स्थानकांदरम्यान आज मेगाब्लॉक

दरम्यान, डंपर द्रुतगती मार्गावरून जाणारी एक बस, कार आणि टेम्पो यांना घासत गेला. डंपरची धडक बसल्याने ट्रक मधील पुठ्ठ्याला आग लागली. या अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील दोन्ही लेनवरील वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी क्रेनच्या साहायाने अपघातग्रस्त वाहने बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. त्यावेळी दंपर मधील दोघेजण अडकून पडले होते. या अपघाताची खोपोली पोलीस ठाण्यात (Express Way ) नोंद करण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.