Lonavala : द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू; दोघे गंभीर

एमपीसी न्यूज – मालवाहतूक सिमेंटचा ट्रक विरुद्ध दिशेने जाणा-या कारवर पडला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या दोघांवर उपचार सुरु आहेत. हा अपघात आज (शुक्रवारी) सकाळी अकराच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याच्या पुढे वळणावर झाला.

                     

ट्रक पुण्याहून मुंबईच्या दिशेने सिमेंट घेऊन जात होता. आडोशी बोगद्याच्या पुढे गेल्यानंतर ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक मुंबई-पुणे लेनवरून जाणा-या मारुती सेलेरो कारवर पडला. या अपघातात एक स्विफ्ट कार खोल दरीत कोसळली. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत . गंभीर जखमी झालेल्या दोघांना तात्काळ उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यातील आणखी एकाचा मृत्यू झाला. अपघातानंतर काही काळ वाहनांच्या लांब पर्यंत रांगा लागल्या. पोलीस आणि इतर सहाय्यक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.

अपघातामध्ये मयत झालेल्या व्यक्तींची नावे 

1. निकिता अविनाश आंग्रे (वय अंदाजे 25)

2. चित्रा अविनाश आंग्रे (वय अंदाजे 42)

3. मृणाली श्रीकांत कुडेकर (वय अंदाजे 60)

4. हसन मेहबूब शहा पटेल

अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींची नावे 

1. अविनाश नारायण आंग्रे (वय अंदाजे 45)

2. जितेंद्र भास्कर बिरारी

तर 1 इसम किरकोळ जखमी असल्याचे कळते .

या घटनेप्रकरणी अर्जुनभाई टापियावाला यांनी फिर्याद दाखल केली असून , अधिक तपास खोपोली पोलीस पथक करत आहेत .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.