BNR-HDR-TOP-Mobile

ExpressWay: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासाचा मेगा ब्लॉक

INA_BLW_TITLE
एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उद्या (गुरुवारी) महामार्गावरील (मुंबई वाहिनीवर) कमान बसविण्यात येणार आहे. त्यासाठी दोन तासाचा मेगा ब्लॉक  घेण्यात येणार आहे. पुणे-मुंबई वाहिनीवरील (मुंबईकडे जाणारी) वाहतूक दुपारी बारा ते दुपारी दोन या वेळेत बंद करण्यात येणार आहे. या बदलाची वाहनचालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक विजय पाटील यांनी केले आहे.

प्रवाशी वाहनांसाठी पर्यायी मार्ग: – खालापूर टोल -खालपूरगांव – खालापूर फाटा (NH04) मार्गे चौक फाटा -दौंड फाटा-शेडूंग टोल-अजिवळी फाटा – परत पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग अशी वळविण्यात येणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाने प्रवास करणार्‍या सर्व वाहनचालंकानी व प्रवाशांनी या मेगा ब्लॉकची नोंद घ्यावी.

वाहनचालकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करावा. या कालावधीत अवजड मालवाहू वाहनांना द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलच्या मागे (फूडमॉल जवळ) थांबवून ठेवण्यात येणार आहे.

HB_POST_END_FTR-A4

.