Form 17 News : दहावी बारावीचा फॉर्म नंबर 17 भरण्यासाठी मुदतवाढ

एमपीसी न्यूज – दहावी बारावीच्या परीक्षेसाठी खाजगी रित्या प्रविष्ट होण्यासाठी नियमित शुल्काने फॉर्म नंबर 17 भरण्याची मुदतवाढ करण्यात आली आहे. 11 ते 25 जानेवारी या कालावधीत विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने हा फॉर्म भरता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली आहे. 

_MPC_DIR_MPU_II

प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार, दहावी बारावीच्या परीक्षेस खाजगी रित्या प्रविष्ट होणा-या विद्यार्थ्यांना 17 नंबर फॉर्म नियमित शुल्काने भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सोमवार दि.11 ते सोमवार दि.25 जानेवारी या कालावधीत नियमित शुल्क भरून फॉर्म भरता येणार आहे. 12 ते 27 जानेवारी दरम्यान विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात कागदपत्र जमा करायची आहेत. 17 नंबर फॉर्म केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारला जाणार आहेत ऑफलाईन पद्धतीने फॉर्म स्विकारला जाणार नसल्याचे पत्रकात म्हटले आहे.

दहावीसाठी – https://form17.mh-ssc-ac.in तर, बारावीसाठी https://form17.mh-hsc-ac.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड व पार्सपोर्ट आकाराचा फोटो जवळ ठेवावा तसेच, संपर्क क्रमांक व ई-पत्ता देणं अनिवार्य आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि 100 रुपये प्रक्रिया शुल्क आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पाचशे रुपये नोंदणी शुल्क तर 100 रुपये प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1