Exam Form : दहावी- बारावीच्या परीक्षेचा 17 नंबर फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी- बारावीच्या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नाव नोंदणी अर्ज अतिविलंब शुल्कासह ऑनलाइन पद्धतीने शुक्रवार (दि.09) ते रविवार (दि.11) दरम्यान भरता येणार आहे‌. 

राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी याबाबत माहिती दिली आहे. राज्य मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खासगीरीत्या फॉर्म नंबर 17 भरून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

एप्रिल-मे 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी खासगीरीत्या प्रविष्ट होणाच्या विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यासाठी 28 नोव्हेंबर 2020 ते 10 फेब्रुवारीपर्यंतचा कालावधी निश्चित केला होता. आता रविवारपर्यंत अतिविलंब शुल्कासह खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ

दहावी :  http://form17.mh-ssc.ac.in

बारावी : http://form17.mh-hsc.ac.in

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.