Pune : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील म्हाडा घरांच्या अर्जासाठी 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – पुणे (Pune) व पिंपरी-चिंचवडकरांसाठी खुश खबर असून ग्राहकांना आता म्हाडाच्या घरांसाठी 20 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहेत. दोन्ही शहरात मिळून 5 हजार 863 सदनिकांसाठी काढलेल्या सोडत निघणार आहे. आत्तापर्यंत एकूण 32 हजार नागरिकांनी अर्ज केलेले आहेत. म्हाडाचे पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.

Alandi : आळंदी मधील सद्भावना ग्रुप व राजे ग्रुप यांचा ढोल ताशाच्या निनादात विघ्नहर्त्याला अखेरचा निरोप

या घरांसाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत गुरुवार (दि. २८) सप्टेंबरपर्यंत होती. गृहनिर्माण योजनेतील 403 सदनिका, पंतप्रधान आवास योजनेतील 431 सदनिका, 15 टक्के सामाजिक गृहयोजनेतील 344 सदनिका, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील दोन हजार 445 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत दोन हजार 445 सदनिका, अशा एकूण 5 हजार 863 सदनिकांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यासाठी 5 सप्टेंबरपासून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

गणेशोत्सव व कार्यालयीन सुट्टींमुळे अधिवास प्रमाणपत्र अथवा इतर आनुषंगिक कागदपत्रांची पूर्तता करण्यास नागरिकांना येत असलेली अडचण लक्षात घेऊन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यामुळे नागरीकांना 20 ऑक्टोबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

अर्जासोबतची आवश्यक कागदपत्रे –
अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला तसेच ज्या आरक्षण असणाऱ्या वर्गातून अर्ज करत असल्यास त्याचे प्रमाणपत्र, असे पुरावे ऑनलाइन अर्जासोबत सादर करणे बंधनकारक केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.