Pune News : रिक्षा मीटर तपासणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज :  पुण्यात रिक्षा भाडेवाढ करण्यात अली असून ती 22 नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. यामुळे ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  

प्राधिकरणातर्फे मीटर तपासणीसाठी चार ट्रॅक निश्‍चित करण्यात आले असून, त्यामध्ये ओंकारेश्‍वर नदीपात्रातील रस्ता, फुलेनगर, आळंदी रस्ता चाचणी मैदान, रामटेकडी इंडस्ट्रियल इस्टेट, इगलबर्ग कंपनी, लेन नं.3 आणि दिवे (पासिंग वाहने) या ठिकाणांचा समावेश आहे.

 

या मीटर तपासणी ट्रॅकवर 25 नोव्हेंबरपासून पासून सकाळी सात ते दहा या वेळेमध्ये ऑटोरिक्षा मीटर तपासणीचे कामकाज करण्यात येणार असून, रिक्षाचालकांनी केलीब्रेशन पूर्ण झालेल्या ऑटोरिक्षा मीटर तपासणीसाठी नजीकच्या ट्रॅकवर सादर कराव्यात, असे आवाहन प्राधिकरणातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.