Chinchwad : तडीपार आरोपी हत्यारासह जेरबंद; येरवडा कारागृहात रवानगी

एमपीसी न्यूज – चिंचवड पोलिसांनी तडीपार केलेला आरोपी चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळून आला. त्या आरोपीकडे घातक शस्त्र मिळाल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. तसेच न्यायालायने आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी केली. ही कारवाई चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. 23) रात्री साडेनऊच्या सुमारास केली.

उचप्पा लिंगाप्पा मंगळूर (वय 25, रा. बिजलीनगर, चिंचवड, पुणे), असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड पोलिसांनी उचप्पा याला दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. तडीपार केलेले असताना देखील तो चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिजलीनगर, गुरूद्वारा रोडने घातक शस्त्र घेऊन संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून उचप्पा याला अटक केली. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी कोयता मिळून आला. यावरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. आज (शुक्रवारी) आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपीची 14 दिवस येरवडा कारागृहात रवानगी केली.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस हवालदार जगताप, स्वप्नील शेलार, अमोल माने, पोलीस शिपाई गोविंद डोके, पंकज भदाने, महिला पोलीस नाईक वंदना गायकवाड यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.