Extortion Case : फायरींगचा बनाव करत व्यावसायिकाकडून मागितली 80 लाखांची खंडणी

एमपीसी न्यूज – कोंढवा येथे व्यावसायिकाला फायरींगाचा बनाव करून 80 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पाचच्या पथकाने आरोपीला अटक केले आहे.

असीफ ईस्माईल खान (वय 33 रा. कोंढवा) असे अटक आरोपीचे नाव असून याप्रकरणी संतोष थोरात यांनी फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व त्याचे साथीदार फरियाज पठाण, समीर शेख, शाहाबाज खान यांनी थोरात यांच्याकडे जात फायरींगचा बनाव करत खोट्या गुन्ह्यात अडकवू आणि जिवे मारून टाकू अशी धमकी देत 80 लाख रुपयांची खंडणी मागितली होती.

Pune news: साताऱ्याकडून पुण्याकडे येणारी वाहतूक नवीन कात्रज बोगद्यातून दरीपूलमार्गे

आरोपीने 26 नोव्हेंबर रोजी कोंढवा येथे दुचाकीवरून घरी जात असताना गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीत थोरात यांना अडकवू अशी धमकी दिली होती. पोलिसांनी तपास केला असता हा गोळीबार झालाच नव्हता.

उलटपक्षी आरोपी हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर करमाड पोलीस ठाणे, औरंगाबाद ग्रामीण येथे दरोड्याचे दोन, चंदननगर पोलीस ठाण्यात खंडणीचा 1 असे एकूण तीन गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे,अशा प्रकारे नागरिकांना असे फसवले असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.