Hinjawadi News: फ्लॅटचे लिव्ह अँड लायसन्स रक्कम न देता मागितली सव्वा कोटींची खंडणी

एमपीसी न्यूज – लिव्ह अँड लायसन्स वर घेतलेल्या फ्लॅटची रक्कम न देता फसवणूक करत एक कोटी 35 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जानेवारी 2019 ते डिसेंबर 2022 या कालावधीत हिंजवडी येथे घडला.

रणजीत कुमार गुप्ता (वय 44, रा. नाना पेठ पुणे) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिला, अनुराग जैन, सौरभ हेमराज बोरा, भारद्वाज, कृष्ण कुमार, गोलू शर्मा आणि अन्य दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PMPML : श्री तुकाई देवी यात्रेनिमित्त नियमित पाच बससह दोन ज्यादा बसचे नियोजन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून लक्ष्मी चौक हिंजवडी येथील पाच मजली इमारतीचे ४० फ्लॅट लिव्ह अँड लायसन्स या तत्त्वावर घेतले होते. त्याचे पैसे फिर्यादी यांना न देता फिर्यादींची फसवणूक केली. तसेच डिपॉझिटचे ५५ लाख रुपये फिर्यादी त्यांना परत देत असताना आरोपींनी फिर्यादीकडे एक कोटी ३५ लाख रुपयांची खंडणी मागितली. तसेच तक्रार मागे घेण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.