Pimpri : आमदार चाबुकस्वार यांचे फेसबुक अकाऊंट हॅक

सायबर क्राईमकडे तक्रार दाखल

एमपीसी न्यूज – पिंपरीचे आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांचे फेसबुक अकाऊंट अज्ञात व्यक्तीने हॅक केल्याची घटना आज उघडकीस आली. यासंदर्भात तातडीने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

येत्या २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी पिंपरी मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीच्या तिकिटावर आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार हे निवडणूक लढवित आहे. सोशल मीडियासाठी ते व त्यांचे विश्वासू कार्यकर्ते वापरत असलेले फेसबुक अकाऊंट सकाळी हॅक झाल्याचे या सर्वांच्या लक्षात आले. या अकाऊंटवरील मोबाईल नंबर, मेल आयडी, पासवर्ड व नावातही बदल केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तातडीने आयुक्तालयातील सायबर क्राईमकडे याप्रकरणी आमदारांचे स्वीय सहाय्यक विजय जगताप यांनी लेखी तक्रार दाखल केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.