Swargate : फेसबुकवर मैत्री करून तब्बल 47 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज –   फेसबुकवर मैत्री करून तब्बल 47 लाखांची फसवणूक केल्याची
घटना स्वारगेट येथे राहणा-या एका 59 वर्षीय व्यक्तीसोबत 6 ऑगस्ट ते 21
सप्टेंबर या कालावधीत घडली.
याप्रकरणी अॅलेशिया स्मिथ (अमेरिकन), कस्टम अधिकारी  दिल्ली, व चार अज्ञात मोबाईलधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅलेशिया स्मिथ हिने फिर्यादींशी फेसबुकद्वारे मैत्री केली होती. त्यांना रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचे दाखवले आणि तिने तिच्यासोबत काही सोने आणले आहे. ती फिर्यादीला भेटण्यासाठी दिल्लीला आली  असून दिल्लीच्या कस्टमच्या अधिका-यांनी पकडले आहे, असे सांगून चार मोबाईलधारकांच्या मदतीने फिर्यादी यांच्याकडून ऑनलाइन व्यवहाराद्वारे 47 लाख 7 हजार 800 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.