Facebook Live: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उन्मुक्त युवा संघटनेद्वारा फेसबुक लाईव्ह  

Facebook Live: Facebook Live by Unmukta Yuva Sanghatana on the occasion of International Yoga Day

एमपीसी न्यूज – सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उन्मुक्त युवा संघटनेद्वारा फेसबुक लाईव्हचे आयोजन केले आहे. या लाईव्ह सदराच्या माध्यमातून नागरीकांना योग प्रात्यक्षिके आणि ध्यान साधना यांचा अनुभव घेता येणार आहे. 

सर्व जगात 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षी सहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उन्मुक्त युवा संघटनेद्वारा फेसबुक लाईव्हचे आयोजन केले आहे.

यात योगासन चॅम्पियनशिप 2019 या पिंपरी चिंचवड जिल्हा योग संस्थेद्वारे आयोजित स्पर्धेची विजेती श्रृंगार घाटबांधे ही योग प्रात्यक्षिके करून दाखवणार आहेत. तसेच, जयहिंद कनिष्ठ महाविद्यालय पिंपरी चे गणित विषयाचे विभागप्रमुख किरण घाटबांधे हे ध्यान साधना करणार आहेत.

उद्या (रविवारी) सकाळी 8 वाजता या कार्यक्रमास सुरूवात होणार असून नागरिकांना याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन उन्मुक्त युवा संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा द्या.

https://www.facebook.com/pg/UYOBH/about/

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.