Facebook Live: मराठा साम्राज्याच्या प्रथम आणि एकमेव स्त्री सरसेनापती-रणचंडी उमाबाई दाभाडे! 

Facebook Live: Sarsenapati-Ranchandi Umabai Dabhade, the first and only woman Commander-in-Chief of the Maratha Empire!

एमपीसी न्यूज – लिम्का बुक रेकॉर्डच्या मानकरी सायली गोडबोले जोशी यांचे ‘मराठा साम्राज्याच्या प्रथम आणि एकमेव स्त्री सरसेनापती – रणचंडी उमाबाई दाभाडे!’ या विषयावरील फेसबुक लाईव्ह व यूट्यूब लाईव्ह बुधवार दि. 10 जून 2020, सायं. 6 वाजता होणार आहे. सर्वांनी हे प्रसारण पाहून सरसेनापती उमाबाईसाहेबांच्या देदीप्यमान इतिहासाला उजाळा द्यावा, असे आवाहन राजमाता वृषालीराजे दाभाडे यांनी केले आहे.    

आयुष्यातील प्रत्येक वळणवेड्या मार्गांवर त्यांनी स्वतःची स्वतंत्र मोहोर उमटवली, त्या काळाला शरण गेल्या नाहीत तर कळीकाळा़लाही आपल्या अंकित करुन गेल्या, त्यांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात दिसतात, दगाबाजी, मुलांची कार्याप्रती उदासीनता, स्वकीयांचे मृत्यू आणि त्यातून आलेला चिरविरह!!

आणि त्यांचे वेगळेपण अधोरेखित होते ते इथेच!! कारण ह्या आत्यंतिक दुःखाच्या बरोबरीने झळकत राहते त्यांचे विलक्षण धैर्य, अमोघ कर्तृत्व, निष्कलंक व्यक्तिमत्त्व, कणखर स्वभाव, उन्नत चारित्र्य, तेजस्वी बुद्धिमत्ता, न्यायाची चाड, परकीयांची चीड, स्वजनांचा कळवळा, जिद्दीची पराकाष्ठा, प्रतिकारवृत्ती आणि मनाला भुरळ पाडणारे लोभस मराठमोळे रूप!!

ह्याच गुणांच्या जोरावर मराठी साम्राज्याची प्रथम आणि एकमेव स्त्री सरसेनापती होऊन त्यांनी इतिहासात स्वतःचे मानाचे स्थान निर्माण केले.

एका सामान्य देशमुखांची कन्या, एक साधी गृहिणी ‘सरसेनापती’ ह्या नावाने इतिहासात गाजली ती सरसेनापती खंडेराव दाभाडे यांची पत्नी म्हणून नाही, तर तिने स्वतःच आपल्या अतुल पराक्रमाने, प्रजावत्सलतेने आणि कर्तव्यदक्षतेने स्त्री सरसेनापती म्हणून जे मानदंड तयार केले त्यामुळेच!!

उमाबाईसाहेबांविषयी आणखी जाणून घेण्यासाठी आता नक्की बघा!!

फेसबुक लाईव्ह – मराठा साम्राज्याच्या प्रथम आणि एकमेव स्त्री सरसेनापती – रणचंडी उमाबाई दाभाडे!! 

बुधवार दि. 10 जून 2020, सायं. 6 वाजता 

व्याख्यात्या-  सायली गोडबोले – जोशी

Facebook Live पाहण्यासाठी येथे क्लिक करा – मराठा साम्राज्याच्या प्रथम आणि एकमेव स्त्री सरसेनापती – रणचंडी उमाबाई दाभाडे!! 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.