Aundh News : औंध भागात दोन फिरत्या विसर्जन हौदाची सुविधा

Facility of two mobile immersion tanks in Aundh area.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा होत आहे. तथापि गणेश विसर्जनाच्या काळातील गर्दी टाळण्यासाठी समाजसेवक नाना वाळके यांनी जय गणेश युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून औंध भागामध्ये दोन फिरत्या विसर्जन हौदाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

औंध मधील अनेक भागातील नागरिकांना घरातील किंवा सोसायटीतील गणेशमूर्तींचे विसर्जन आता आपल्या परिसरामध्ये करणे शक्य होणार आहे. दरवर्षी औंध आणि बाणेर नदीच्या घाटावरती गणेश विसर्जनासाठी हौद उभे केले जातात.

त्यात आसपासच्या परिसरातील नागरिक आपल्या गणेशाचे विसर्जन करतात. यावर्षी कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी गणेशाचे घरच्या घरीच विसर्जन करण्याचे ठरवले आहे.

_MPC_DIR_MPU_II

गणेश विसर्जनासाठी सार्वजनिक हौदावर नागरिकांनी गर्दी करू नये यासाठी औंध भागात नाना वाळके यांच्या संकल्पनेतून फिरत्या विसर्जन हौदाच्या उपक्रम राबवला जात आहे.

यापूर्वीही नाना वाळके यांनी जय गणेश प्रतिष्ठान च्या माध्यमातून मूर्तीदान हा उपक्रम सुद्धा राबवला होता. नागरिकांनी संपर्क साधल्यानंतर लगेच नागरिकांच्या घरी अथवा सोसायटीच्या आवारामध्ये हा फिरता हौद येणार आहे.

नागरिकांनी 8888148148, 8888888148 यावर क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नाना वाळके यांनी गणेश भक्तांना केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.