Fact Check : सरकार प्रत्येक कोरोना रुग्णामागे पालिकेला दीड लाख रुपये देत असल्याची माहिती चुकीची

हा संदेश चुकिचा असून त्यात काही तथ्य नसल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – महापालिका आणि नगरपालिकांना प्रत्येक कोरोना रुग्णामागे दीड लाख रुपये मिळत असल्याचा संदेश सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मात्र, हा संदेश चुकिचा असून त्यात काही तथ्य नसल्याचे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणा-या संदेशात म्हटले आहे की, प्रत्येक कोरोना रुग्णामागे दीड लाख रुपये खर्च देण्यात येईल, असे नगरपालिका आणि महानगरपालिका असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहे.

महानगरपालिका, नगरपालिका, पॅथोलॅब आणि प्रायव्हेट डॉक्टर्स हे सर्व मिळून कोरोना रुग्णांची संख्या जास्तीत जास्त कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न केला जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

सामान्य माणसाला ताप किंवा खोकला झाला की त्याला कोरोना पॉझिटीव्ह घोषित करत आहेत. जेणेकरून प्रत्येक व्यक्तीमागे दीड लाख कमवता येतील.

केंद्र सरकार कडून हा प्लॅन सध्या पूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात सुरू झाला आहे. कोरोना हा आता कोणताही आजार राहिलेला नसून तो आता मेडिकल इंडस्ट्रीचा धंदा झाला आहे, असा संदेश व्हायरल होत आहे.

दरम्यान, सरकारने हा संदेश खोटा असल्याचे सांगितले असून त्यात कसलेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. लोकांनी या संदेशावर अजिबात विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.