Pune : हे सरकार मराठ्यांच्या विरोधात नाही – विनायक मेटे

एमपीसी न्यूज – मुख्यमंत्री बदलण्याची आमची कोणतीही भूमिका नाही, उलट शिवसंग्राम संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर वसतिगृह बांधणे, आण्णासाहेब पाटील महामंडळाला 500 कोटी रुपये देण्याचा निर्णय याच मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. आगामी काळात सरकारसोबत राहायचे की नाही हा निर्णय भविष्यात घेऊ, हे सरकार मराठ्यांच्या विरोधात असल्याचे अजिबात वाटत नाही, असे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी व्यक्त केले. 

पुण्यामध्ये आज मराठा समाजाच्या मागण्यांवर शिवसंग्रामच्या राज्य कार्यकरिणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर 30 वर्षांपासून शिवसंग्राम मराठा समाजाच्या समस्यांसाठी लढत आहोत. जे सध्या आंदोलन सुरू आहे ते आंदोलन लोकशाही पद्धतीने करावे. आंदोलनाचा त्रास इतरांना होता कामा नये. कोणतेही प्रश्न संवादाने सुटू शकतात म्हणून सर्व आंदोलकांनी चर्चेची भूमिका घ्यावी, असे विनायक मेटे यांनी सांगितले.

तर कोणाचेही नेतृत्व मान्य करायला आंदोलक तयार नसतील तर प्रत्येक जिल्ह्यातील 5-5 आंदोलक नेमून सरकारसोबत चर्चा करावी. चर्चा पारदर्शक झाली हे दाखविण्यासाठी लाईव्ह करावी, असे देखील विनायक मेटे म्हणाले आहेत. तर मराठा समाजाच्या समस्यांसाठी शिवसंग्रामचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देखील मेटे यांनी यावेळी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.