Pune : सव्वालाखाच्या नकली नोटा वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – नकली नोटा वटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई काल मंगळवारी(दि.8) पावणे चार च्या सुमारास ताडीवला रोड येथील महात्मा फुले शाळेसमोर करण्यात आली.
राजेश चंद्रभान ढिलोड(वय 45, रा.सिद्धार्थनगर, नगर रोड) आणि अलका रोहिदास क्षीरसागर (वय 44, रा. भाजी मार्केट चौक, ताडीवाला रोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.याप्रकरणी जयवंत जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी ताडीवला रोड येथील महात्मा फुले शाळेसमोर राजेश आणि अलका हे दोघेजण तब्बल 1 लाख 17 हजारांच्या भारतीय चलनाच्या नकली नोटा वटविण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी पुढील तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.