Fake Video : मुले पळवून नेणाऱ्या टोळीच्या व्हिडीओ ‘फेक’ – पुणे पोलीस

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून सोशल मिडीयावर मुलाला पळवणाऱ्या टोळीचा फोटो व व्हिडीओ व्हायरल होत असून या व्हिडीओमध्ये कोणतेच तथ्य नसून हा फेक व्हिडीओ (Fake Video ) असल्याचे पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे सांगण्यात आले आहे.  

लहान मुले पळविणारी टोळी सक्रीय झाल्याबाबत फेसबुक, व्हाट्सअप, ऑडीओ / व्हिडीओ क्लिप, फोटो वायरल होत आहेत. त्यामुळे जनमानसांत व विशेषतः पालकांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण पसरत आहे. तसेच मागील दोन दिवसांपासून सोशल मिडीयावर काही विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल केले जात असून त्यांना शाळेतून पळवून / अपहरण करून नेले आहे, अशा अफवा पसरविल्या जात आहेत.

Monginis Dealership : ‘मॉन्जिनीज’ची फ्रेंचाइजी देण्याच्या बहाण्याने 12 लाखांची फसवणूक

परंतु यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसून,अशा प्रकारची कोणती घटना पुणे शहरात घडलेली नाही (Fake Video), तरी पालकांनी अशा प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये. असा प्रकार आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेबाबत शहनिशा करून घ्यावी, असे आवाहन पुणे शहर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

अशा प्रकारची माहिती अथवा संदेश मिळाल्यास (Fake Video) नागरीकांनी पूर्ण खात्री केल्याशिवाय ते प्रसारित करू नयेत. अशा प्रकारच्या खोट्या माहितीव्दारे अफवा पसरविणाऱ्या नागरिकांविरूध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असा इशाराही पुणे पोलीस आयुक्तालयाने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.