Talegaon News : राजकीय बदनामीसाठी विरोधकांकडून खोटे आरोप – सुधाकर शेळके

एमपीसी न्यूज – नगरपरिषद निवडणुकांच्या तोंडावर राजकीय बदनामी करण्यासाठी आपल्या विरुद्ध  ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा प्रत्यारोप मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू व उद्योजक सुधाकर शेळके यांनी केला आहे.

सुधाकर शेळके यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात तो चर्चेचा विषय झाला आहे.

काही मंडळी दमदाटी करून तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत. त्यामुळे गेले काही दिवस आपल्याला पोलिसांनी संरक्षण दिले आहे.त्यामुळे आपल्या प्रत्येक कृतीला पोलीस साक्षीदार आहेत.त्यामुळे आपल्याविरुद्ध कितीही खोट्या तक्रारी केल्या तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असे सुधाकर शेळके ‘एमपीसी न्यूज’शी  बोलताना म्हणाले.

स्वतःवरील आरोप झाकण्यासाठी केवळ राजकीय हेतूने आपल्या विरुद्ध खोट्या तक्रारी नोंदवण्याचे कारस्थान विरोधकांकडून केले जात आहे, त्याला आपण भीक घालत नाही. पोलीस चौकशीत ‘दूध का दूध और पानी का पानी’ सिद्ध होईलच. पोलीस चौकशीअंती जो निष्कर्ष निघेल तो आपल्याला मान्य आहे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.