Family beaten : किरकोळ कारणावरून कुटुंबाला मारहाणीच्या खेड व चऱ्होलीत दोन घटना

एमपीसी न्यूज : किरकोळ कारणावरून खेड येथील केळगाव येथे शेजाऱ्यानी पती-पत्नीला तर चऱ्होलीतील कोतवालवाडी येथे कुटुंबालाच नातेवाईकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.(Family beaten) त्यानुसार चाकण व दिघी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.

खेड येथे चौघांनी मिळून पती-पत्नीस बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 19) रात्री साडेआठ वाजता केळगाव, ता. खेड येथे घडली.भीमा शंकर वाघुंडे, ऋषिधर वाघुंडे आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहार. याप्रकरणी महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराशेजारी राहणारा भीमा शंकर वाघुंडे याने त्याच्या कुटुंबियांसह मिळून फिर्यादी महिलेच्या पतीला मारहाण केली. फिर्यादी भांडण सोडविण्यासाठी मध्ये गेल्या असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करून शिवीगाळ केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Chakan fraud : आयुर्वेदिक जडीबुटी विक्रीच्या बहाण्याने चार लाखांचा गंडा घालणाऱ्या तिघांना अटक

तर चऱ्होलीमध्ये घरगुती कारणावरून सात भावंडांनी दोन बहिणी आणि त्यांच्या मुलांना मारहाण केली. ही घटना 15 सप्टेंबर रोजी कोतवालवाडी रोड, चऱ्होली येथे घडली.

सिराज गुलाब मुलाणी, समीर गुलाब मुलाणी, जमीर गुलाब मुलाणी, सद्दाम मुबारक मुलाणी, रेहान अकबर मुलाणी आणि दोन महिला अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.(Family beaten) याप्रकरणी 47 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या घराबाबत वाद सुरु असल्याने चर्चा करण्यासाठी फिर्यादी थांबल्या होत्या.(Family beaten) त्या कारणावरून फिर्यादी यांचे भाऊ आरोपींनी फिर्यादी, त्यांचा मुलगा, फिर्यादीची बहीण आणि त्यांच्या मुलाला हाताने, लाकडी बांबूने आणि फायबरच्या दांडक्याने मारहाण केली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.