Sangvi : कुटूंब कोकण पर्यटनाचा आनंद घेत असताना चोरट्यांनी फोडले घर

एमपीसी न्यूज – संपूर्ण कुटूंब कोकण पर्यटनासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घर फोडले. चोरट्यांनी घरातून 61 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली.

मीना रामदास गायकवाड (वय 46, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीना यांचे कुटुंब शुक्रवारी (दि. 7) सकाळी दहा वाजता कोकण पर्यटनासाठी गेले. दरम्यान, त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. मीना यांचे कुटूंब कोकण पर्यटनाचा आनंद घेत असतानाच अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. हॉलमधील कपाटात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर वस्तू असा एकूण 61 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. मीना कोकण-पर्यटनावरून रविवारी सकाळी अकरा वाजता घरी आल्या असता हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ सांगवी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.