Shivajinagar – किरकोळ वादातून दोन कुटुंबांमध्ये दगड – कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – किरकोळ वादातून दोन कुटुंबांमध्ये दगड कोयत्याने मारहाण झाल्याची घटना काल रविवार दि.4) रात्री साडेसात च्या सुमारास शिवाजीनगर येथील कामगार पुतळा वसाहत येथे घडली.

याप्रकरणी शालन साठे ( वय 50, रा शिवाजीनगर ) आणि सुनिल बागुल (वय 42, रा. शिवाजीनगर) यांनी परस्पर विरोधी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर येथील कामगार पुतळा वसाहत येथे समोरासमोर राहणा-या साठे आणि बागुल  या दोन कुटुंबियांमध्ये पूर्वीपासून आपापसात वाद होते. परंतु काल या दोन्ही कुटुंबातील मुलांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले व या वादाला गंभीर स्वरूप प्राप्त झाल्याने त्यांचे कुटुंबिय देखील या वादात सहभागी झाले. या भांडणामध्ये बागुल कुटुंबाचे पाचजण तर साठे कुटुंबाचे सहा ते सातजण असे सहभागी होते.

दरम्यान त्यातील साठे कुटुंबियांवर दगडाने मारहाण झाली तर बागुल कुटुंबियांवर कोयत्याने वार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या वादात दोन्ही कुटुंबातील व्यक्ती जखमी झाल्या आहेत. या भांडणामुळे तेथील परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

याप्रकरणी पोलीसांनी बागुल कुटुंबातील एकाला कर साठे कुटुंबातील दोघांना असे एकूण तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.