Chakan : जलसमाधी घेतलेल्या धरणग्रस्ताच्या कुटुंबाला न्याय

चार एकर जमीन मिळाली; आ. सुरेश गोरे यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज – भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ (सुतार) या धरणग्रस्त शेतकऱ्याने शनिवारी (दि.८) जलसमाधी घेतली होती. सदर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी खेड तालुक्याचे आमदार सुरेश गोरे हे त्यांच्या राहत्या घरी रविवारी (दि.९) गेल्यानंतर त्यांनी तत्काळ शासनस्तरावर पाठपुरावा करून गुंजाळ कुटुंबाला पुनर्वसनाची जमीन मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. 

या आश्वासनाच्या अनुषंगाने सोमवारी (दि.१०) आमदार सुरेश गोरे यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर पाठपुरावा करून अपर जिल्हाधिकारी रमेश काळे तसेच जिल्हा पुनर्वसन अधिकारी उत्तम पाटील यांच्याकडून धरणग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीने चार एकर जमीन वाटपाचे आदेश तसेच सातबाराही बनवून घेऊन गुंजाळ (सुतार) कुटुंबाला सुपूर्त केला आहे. यामुळे गुंजाळ कुटुंबाला न्याय मिळाला असल्याची भावना धरणग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी पुणे जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी उत्तम पाटील यांच्यासह मंजुळबाई दत्तात्रय गुंजाळ (सुतार), शेतकरी सेनेचे एल.बी.तनपुरे, मा. सरपंच दत्ता रौंधळ, चेअरमन कांताराम रौंधळ, अनंथा ओझरकर, भगवान ओझरकर, मल्हारी शिवेकर, भरत  रौंधळ, बाळासाहेब ओझरकर तसेच रौंधळवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.