Pune News : प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज : प्रख्यात उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.(Pune News) बिर्ला यांना त्यांच्या व्यापार आणि उद्योगातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कुमार मंगलम  बिर्ला म्हणाले, “राष्ट्र उभारणी आणि विश्वस्ततेच्या भावनेने माझ्या कुटुंबाला पिढ्यानपिढ्या मार्गदर्शन केले आहे.(Pune News) आणि म्हणूनहा राष्ट्रीय सन्मान मिळणे हे खरोखरच सुखद आणि विनम्र करणारे आहे. वेगवेगळ्या 36 देशांमध्ये असलेल्या माझ्या 1,40,000 सहकाऱ्यांच्या वतीने मी स्वीकारत असलेल्या या प्रतिष्ठित सन्मानाबद्दल भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो आहे.

 

Pune : ‘चैत्र पालवी’ कार्यक्रमाने नव वर्षाची संगीत,नृत्यमय सुरुवात

 

आदित्य बिर्ला समूहाने एक मोठ्या काळापासून लोकांचे (Pune News) जीवन समृद्ध करण्यात आणि उद्योग व्यवसाय हे उत्तमाच्या ध्यासासाठी एक शक्ती आहे हे प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवण्यासाठी  जो प्रभाव पाडला आहे त्या प्रभावाची हा पुरस्कार म्हणजे एक पोचपावती आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.