Pune Crime News : प्रसिद्ध डॉक्टरला आयकर विभागाची भीती दाखवून दहा लाखाची खंडणी मागितली, तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यातील एका प्रसिद्ध डॉक्टरला तुमच्या विरोधात आयकर विभागात तक्रार आली असून प्रकरण मिटवायचे असल्यास दहा लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून खंडणी  (Pune Crime News) मागणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे न दिल्यास तुमच्या विरोधात कारवाई केली जाईल, अशी धमकीच या डॉक्टरला देण्यात आली होती. 

श्रीकांत पांढरे आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर परिसरातील एका प्रसिद्ध रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.

 

Pimpri News: आत्मनिर्भर भारतासाठी ‘उडान’ उपक्रम प्रोत्साहनात्मक ठरेल – किरणराज यादव

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर शुक्रवारी सायंकाळी हॉस्पिटलमध्ये (Pune Crime News) असताना आरोपी श्रीकांत एका साथीदारांसह त्यांच्या रुग्णालयात आला. त्याने तुमच्या विरोधात मुंबईतील आयकर विभागात तक्रार करण्यात आली आहे. हे प्रकरण मिटवायचे असल्यास तुम्हाला दहा लाख रुपये द्यावे लागतील. अन्यथा आयकर विभाग तुमच्यावर कारवाई करेल, अशी धमकीच दिली.

दरम्यान या सर्व प्रकरणानंतर संबंधित डॉक्टरने हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनीही या प्रकरणी तातडीने खंडणीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.